धक्कादायक! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर गंभीर गु.न्हा दाखल करत ‘ही’ अभिनेत्री म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे अलीकडे सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आपल्या बो.ल्ड फोटोजमुळे नेहमीच वा.दात सापडणारी पूनम आता पुनः एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडे हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रावर गंभीर आरोप केला आहे.

राज कुंद्राने आपला फोटो चोराला असल्याचा आरोप पूनमने केला आहे. पूनमने राज कुंद्रा विरुद्ध मुंबई उच्च न्यायलयात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. याप्रकरणी पूनमने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पूनमने सांगितले की, राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाहाची कंपनी आर्म्सप्राईम मीडियाने डील संपल्यानंतरही माझा कंटेंट चोरला आहे.

तसेच राज आणि सौरभच्या कंपनीने बेकायदेशीररीत्या माझे फोटोज आजी व्हिडिओचा वापर केला आहे. माझे आणि कंपनी मधील कॉन्ट्रॅक्ट आठ महिन्यांपूर्वीच संपून देखील कंपनीने माझा कंटेंट वापरला आहे, असं पूनमने याचिकेत म्हटलं आहे.

मात्र, राज कुंद्राने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोर्टाकडून अद्याप आपल्याला याप्रकरणी कोणतीही नोटीस आली नसल्याचं राज कुंद्राने स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्या कंपनीने असं काहीच केलं नसल्याचंही राजने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पूनम पांडेने 2 महिन्यापूर्वीच लग्न केलं आहे. पूनम पांडेनं सप्टेंबर महिन्यात तिचा लॉंग टर्म बॉयफ्रेंड असणाऱ्या सॅम बॉम्बेशी विवाह बंधनात अडकली आहे.

मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पूनम पांडेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत त.क्रार दाखल केली होती. मात्र, तिने नंतर आपली तक्रार मागे घेतली होती. पूनम पांडे प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टरांनी पूनम गरोदर असल्याचा खुलासा केला होता. डॉक्टरांनी केलेल्या खुलास्यांमुळे तिच्या गरोदरपणाविषयी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, पूनम पांडेने या चर्चांवर काहीही उत्तर दिलं नव्हतं. मात्र, पूनमनं या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी मौन सोडलं आहे.

पूनम म्हणाली की, मी गरोदर असल्याच्या चर्चांबाबत काही सत्य असेल तर मी स्वतः माहिती देईल. मी खुलेपणाने ते जगाला सांगेल. पूनमने गरोदर असल्याच्या बातमीला नीटसा होकारही दिला नाही किंवा पूर्णपणे नकारही दिला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांसाठी खुशखबर! 3 दिवसांत तब्बल इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं

इंदोरीकर महाराज प्रकरणाला धक्कादायक वळण, सरकारी वकिलांमुळे नवीन ट्विस्ट!

‘ही’ अभिनेत्री चक्क रस्त्यावर नाचत होती, अन् लोक भिकारी म्हणून पैसे टाकत होते; वाचा सविस्तर

सरनाईकांविरुद्ध ईडीने कारवाई करताच शरद पवार संतापले, भाजपवर निशाणा साधत म्हणाले…

कंगनाच्या अट.केवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय!