धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल

नवी दिल्ली | कोरोनानं गेल्या दोन वर्षांपासून थैमान घातलं आहे. अद्यापही कोरोना काही संपायचं नाव घेईना. कोरोना महासाथीच्या रोगानं नागरिकांचीही भीती वाढवली आहे.

देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने दहशत माजवली आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता सगळेच देश धास्तवून गेले आहेत. त्यातच कोरोनानेही पुन्हा डोकं वर काढलं आहे.

ओमिक्राॅन हा कोरोना महामारीच्या अंताची नांदी असू शकेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे खरंच आता कोरोनाचा अंत होणार का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना लसीचे डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

बिहारमधील एका 84 वर्षीय आजोबांनी मात्र एक, दोन नव्हे तर आतापर्यंत तब्बल 11 वेळा ही लस घेतली आहे. याशिवाय त्यांना आता बूस्टर डोसही घ्यायचा आहे.

तब्बल 11 वेळा लस घेतल्यामुळे ब्रह्मदेव मंडल या 84 वर्षीच्या व्यक्तीवर एफआयआर दाखल झाली झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेळा लस घेण्यासाठी वेगवेगळे आयडी वापरल्याबद्दल पुरैनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मंडल यांना अटक करण्यात येऊ नये, अशी मागणी आरजेडीचे आमदार चंद्रशेखर यांनी केली होती. त्यामुळे आता सीआरपीसीच्या 41 कलमानुसार घोषणापत्र सादर केल्यानंत आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

अनेक ठिकाणी लसीकरणापासून वाचण्याच्या युक्त्या लढवल्या जात आहेत. तर काही ठिकाणी लसीच्या अनेक डोस घेतले जात आहेत. त्यामुले सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम

  T20 World cupचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने सामने

  ‘…त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

  एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

  ‘या’ ठिकाणी शाळा बंदच राहणार, धडकी भरवणाऱ्या आकडेवारीनं चिंतेत भर