धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण

बुलढाणा | कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत चाललेली पहायला मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलढाण्यात 28 जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. शाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत 10 टक्के शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांमधून 1 हजार 687 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षकांच्या कोरोना चाचण्या अचानकपणे पाॅझिटिव्ह येऊ लागल्यानं आरोग्य विभागावरही तणाव निर्माण झाला. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या शिक्षका आता ऑनलाईन वर्ग घेत आहेत.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महासाथीच्या रोगानं हाहाकार माजवला असून भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना विषाणू आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. सध्या कोरोना विषाणूचा ओमिक्राॅन व्हेरियंट हातपाय पसरवत चालला आहे.

कोरोना आणि कोरोनाच्या व्हेरियंटनं सगळ्यांनाच हैराण करुन टाकलं आहे. यातच तज्ज्ञांकडून नवनवीन सल्ले आणि इशारे दिले जात आहेत. त्यामुळे अधिक चिंतेचं वातावरण पहायला मिळत आहे.

जीवघेण्या कोरोनाचा अंत कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अनेक वैज्ञानिक यावर तर्कवितर्क लावत आहेत. मात्र अद्यापही या प्रश्नावर शास्त्रज्ञ कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने