धक्कादायक… स्वारगेटजवळच्या नाल्यात सापडलं अर्भक!

पुणे |  एकीकडे स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली जात असताना दुसरीकडे स्त्री जातीच्या अर्भकाला कुठे रस्त्यावर तर कुठे कचऱ्यात तर कुठे चेंबरमध्ये फेकून दिल्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

स्वारगेटजवळच्या लोहियानगर परिसरातील झोपडपट्टीत पालिकेच्या सफाई कामगारांना चेंबरमधील गाळ काढताना एक अर्भक सापडल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांना हे अर्भक सापडल्यानंतर बघ्यांनी एकच गर्दी केली होती. छोट्या बाळाला बघून नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पुणे पोलिसात झाली आहे.

दरम्यान, अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच अज्ञात पलकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

-कुणीही असो गरज पडल्यास चौकशीला बोलावू; चौकशी आयोगाचा फडणवीसांना दणका

-सरपंच निवडीसंदर्भातला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

-देशातील सर्व बॉम्बस्फोटांमागे RSS चा हात आहे- नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील

-मोदी आणि शहा खुनी आहेत…. तसे माझ्याकडे पुरावे- न्या. कोळसे पाटील