Top news आरोग्य कोरोना पुणे

कोरोनासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर; डिसेंबर-जानेवारीत…

पुणे | देशात सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. भारताने ६९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यातील पुण्याने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत तर एक लाख सात हजार चारशे पन्नास लोकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात ९ लाख ९० हजार सहाशे एक रुग्ण सक्रिय आहे. नुकतेच केंद्र शासनाच्या वतीने द्विस्तरीय शिष्टमंडळाने पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या आढावात त्यांनी डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालिकेने या दृष्टीने तयारी करावी, पालिकेतील खाटांची संख्या आणि अन्य गोष्टींच्या बाबतही त्यांनी दक्ष राहावे, अशा सूचना शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला दिल्या आहे. पालिकेने कोरोना रुग्णांसाठी उभारलेले रुग्णालय, तसेच तेथील सोयी सुविधा आणि त्यांनी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती घेतल्यावर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनासंदर्भात केंद्र शासनाने जसे नियम सांगितले आहे, त्याप्रमाणे अगदी सक्षमपणे महानगरपालिका काम करत आहे, असं निरीक्षण शिष्टमंडळाने नोंदवलं आहे. या माहितीचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळातील सदस्यांशी संपर्क साधला असता, समाधानकारक काम झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सध्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी चार दिवसात पुण्यातील विविध कोविड सेंटरला भेट दिली. यानंतर त्यांनी कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची माहिती घेऊन महापालिकेत बैठका घेतल्या.

या बैठकीत त्यांनी काही महत्त्वापूर्ण सूचना केल्या. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा दौरा संपला. या पथकाने कोविड तपासण्या वाढवण्यापेक्षा जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच तपासण्या करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. आयसीएमआरने घालून दिलेले तपासणीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहे.

कोरोनाच्या व्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच त्या रुग्णांच्या आजाराचा धोका टळेल, यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहे. सध्या रुग्ण संख्येची टक्केवारी पाहता त्यांची संख्या घटत असल्याचे चित्र दिसून आले आहे. पुण्यामध्ये दिवसाला हजार रुग्ण आढळून येत आहे.

पण मागील काही दिवसांपासून सातशेच्या आसपास रुग्ण आढळत आहे, ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. रुग्ण वाढीचा दर आणखी कमी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शिष्टमंडळाने नागरिकांना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनानं आता ‘त्या’ प्रकरणी दीपिकाला डिवचलं, दीपिकाचं नाव न घेता कंगना म्हणाली…

पायल घोषला ‘ते’ वक्तव्य महागात पडणार? कोर्टानं पायलच्या विरोधात दिला निर्णय

सुशांत प्रकरणी अभिनेता शेखर सुमन पुन्हा संतापला म्हणाला…

हाथरस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती उघड, पीडितेची वहिनी म्हणून आलेली ती…

भीक मागितली, झाडून घेतलं; आता 150 लोकांना काम दिले, इतक्या कोटींची कमाई!