धक्कादायक! रक्षाबंधननंतर काही दिवसातच भावाने ज्याप्रकारे बहिणीचा खून केला ते ऐकून तुम्हीही व्हालं थक्क

कासारगोड | भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सन रक्षाबंधन नुकताच पार पडला. मात्र रक्षाबंधननंतर अवघ्या काही दिवसातच भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केरळमध्ये 22 वर्षीय भावानं आपल्या 16 वर्षाच्या सख्ख्या बहिणीला आईस्क्रीममध्ये विष टाकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भावाविरुद्ध  गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

22 वर्षीय अलबीन आणि 16 वर्षीय अॅना आपल्या आईवडिलांसोबत केरळमधील कासारगोड जिल्ह्यात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून अलबिन आपली लहान बहिण अॅनाला मारण्याचा प्रयत्न करत होता. अलबिनने एकदा अॅनाच्या जेवणात विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न फसला.

3 ऑगस्टला अलबिननं फ्रीजमध्ये दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आईस्क्रीम ठेवलं. त्यातल्या एका भांड्यातील आईस्क्रीममध्ये त्यानं विष टाकलं होतं. विष टाकलेलं आईस्क्रीम त्यानं बहिण अॅनाला खाऊ घातलं. बहिणीबरोबर ते आईस्क्रीम वडील बेन्नी यांनीही खाल्ले. थोड्या वेळानं दोघांना अस्वस्थ वाटू लागल्यानं  त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, अॅनाच्या शरीरात जास्त विष भिनल्यानं तिचा 6 ऑगस्ट रोजी रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान,  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलबीनला हळूहळू संपूर्ण कुटुंबाला मारून घरात एकटं रहायचं होतं. पोलिसांनी अलबीनला ताब्यात घेतलं असून पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील पवार-फडणवीसांचा ‘हा’ योगायोग महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा तर नाही ना?

“महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे”

मनोरंजन विश्वातल्या ‘या’ लोकप्रिय जोडीनं अखेर घटस्फोट घेतला

…म्हणून सख्या भावानेच भावाला जाळलं; बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

‘लग्न करणार तर रामदेव बाबाशीच …’; ‘या’ आयटम गर्लने रामदेव बाबांना लग्नाची मागणी घातली