धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई | मागील दोन वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला होता. अशातच आता सर्वत्र लसीकरण मोहिम सुरू आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर जानेवारीत लसीकरण मोहिम सुरू केली गेली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली. मात्र, यावेळी मृत्यूदर घटल्याचं पहायला मिळालं होतं.

अशातच आता देशातील कोरोना आकडेवारी पुन्हा वाढू लागल्याने देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

मात्र, आता 18 ते 64 वयोगटातील लसीकरण पुर्ण होत असल्यानं आता 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला केंद्राने परवानगी दिली आहे. अशातच आता औरंगाबादमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामुळे एका वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लस घेण्याअगोदर संबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलं होतं. विद्यार्थीनी ही एक आरोग्य सेविका होती. यामुळे तिला लस घेण्यास भाग पाडलं गेलं.

विद्यार्थीनीने लस सुरक्षित असल्याच्या हमीच्या आधारे लस घेतली. मात्र, सगळं उलटंच झालं. लसीच्या दुष्परिणामांमुळे तिचा मृत्यू झाला, असा दावा याचिकाकर्ते लुणावत यांनी केलाय.

विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लस सुरक्षित असल्याचा दावा खोटा असल्याचं मुलीच्या मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे, असं लुणावत यांनी याचिकेमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?” 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…