धक्कादायक! मतिमंद मुलीवर बलात्कार; सहा महिन्यानंतर ‘अशा’ प्रकारे सत्य आलं समोर

खेड | कोरोनाकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशातच आता खेड मधील कानेरसर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधमानं मतिमंद मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला होता. मतिमंद मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार सर्वांसमोर उघडकीस आला आहे.

कानेरसर येथे राहणारा आरोपी महेश उर्फ पिंट्या दौंडकर हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहतो. सहा महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी महेश संधी साधत घरात घुसला आणि पीडितेवर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

काही दिवसांनी पीडित मुलगी आजारी असल्यानं तिच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या आईवडिलांनी मुलीला मोशी येथील चैतन्य महिला संस्थेत दाखल केलं.

दरम्यान, या घटनेबाबत चैतन्य महिला संस्थेनं खेड पोलिसांना माहिती दिली. खेड पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तपासात गडबड करू शकतात”

पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही; शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं

वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकार आज घेणार महत्वाची भूमिका

सतत गोड खाताय?; वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ वाईट परिणाम!

सावधान! ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉल करताय?; एकदा ही माहिती वाचा अन्यथा खिशाला लागू शकते कात्री!