मुंबई | दाऊद इब्राहिम गँगबाबत NIA च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता दाऊद इब्राहिमचं टार्गेट राजकीय नेते असल्याचं कळतंय.
दशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे.
NIAने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर NIAने 57 लोकांना चौकशीकरता बोलावलं होतं.
1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत.
हे कोण राजकीय नेते आहेत, तसेच दाऊद आणि छोटा शकील कुठे आहेत, त्यांचं ठिकाण शोधायचं आहे, असं NIAने आपल्या कोठडी अहवालात युक्तिवाद केला आहे
दरम्यान, देशात घातपात घडवण्यासाठी डी गॅंग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा आज NIA ने कोर्टात केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!
‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन
पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं
मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत