व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी धक्क्दायक खुलासा समोर!

मुंबई | बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आणखी दोघा आरोपींनी पोलिसांनी बियाणींच्या हत्येप्रकरणी अटक केली. नांदेड पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. कृष्णा पवार आणि हरीश बाहेती, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

आतापर्यंत एकूण 9 जणांना संजय बियाणींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संजय बियाणींच्या हत्येपूर्वी आरोपींनी नांदेडमध्ये दोन महिने रेकी केली होती. तसंच बियाणी यांच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती.

संपूर्ण नांदेड संजय बियाणींच्या हत्येनंतर हादरलं होतं. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडानं पोलिसांवरही अनेक सवाल उपस्थित केले होते. बियाणी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सहा राज्यात पथके पाठवण्यात आली होती. विदेशात देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता.

दरम्यान, संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही” 

केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा! 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!