Top news मनोरंजन

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणी रोज नवनवीन गोष्टी अमोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय टीम याप्रकरणी तपास करत आहे. तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीम सुशांतच्या मेडिकल रिपोर्ट्सची फेर तपासणी करत आहे.

मंगळवारी एम्सच्या मेडिकल टीमनं सुशांतचा व्हि.सेरा रिपोर्ट सीबीआय अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. या रिपोर्टनं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. सुशांत प्रकरणी सुरुवातीपासून सुशांतला वि.ष दिलं गेल्याचा दावा अनेकांनी केला आहे. अशातच आता सुशांतला विष दिलं गेलं होतं का?, याचा खुलासा व्हि.सेरा रिपोर्टनं केला आहे.

सुशांत सिंह राजपूतला कोणत्याही प्रकारचं वि.ष दिलं गेलं नव्हतं, असं या व्हि.सेरा रिपोर्ट मधून समोर आलं आहे. त्यामुळे सुशांतच्या मृ.त्यूच्या कारणांचे ठोस पु.रावे अद्याप शोधू न शकणाऱ्या सीबीआयला आणखी एक धक्का बसला आहे.

तसेच या मेडिकल रिपोर्टमध्ये कुपूर रुग्नालयातील डॉक्टरांनी केलेल्या श.वविच्छे.दनाबाबत सुद्धा तक्रार केली आहे. सुशांतच्या श.ववि.च्छेदनावेळी कुपूर रुग्णालयानं पुरेश खबरदारी घेतलेली नाही, असं एम्स रुग्णालयानं मेडिकल रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा त्याच्या वांद्रा येथील राहत्या घरी मृ.तदेह आढळला होता. सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती की सुशांतची ह.त्या करण्यात आली होती हे अद्याप देखील स्पष्ट होऊ शकलं नाही. सीबीआय टीम सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतच्या मृ.त्यूला कारणीभूत सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय असल्याचा आ.रोप केला होता. मात्र, सीबीआयला तपासादरम्यान सुशांतच्या मृ.त्यूला चक्रवर्ती कुटुंब कारणीभूत असेल, असे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीला अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती वि.रोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. रियाच्या अटकेनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज एनसीबीच्या र.डारवर आले आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि नम्रता शिरोडकर या सध्या अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या र.डारवर आहेत. शनिवारी दीपिका पादुकोण, सारा आली खान आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. आपण केव्हाच ड्र.ग्जच सेवन केलं नसल्याचं तिनही तारकांनी एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

अभिनेत्री सारा अली खाननं यावेळी सुशांत आणि तिच्या रिलेशन विषयी सुद्धा कबूली दिली आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटावेळी मी आणि सुशांत रिलेशनमध्ये होतो, अशी कबूली सारा अली खाननं यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसे भाजप सोडणार?; कार्यकर्त्यांसोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तराने हैराण झाले एनसीबीचे अधिकारी

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी…

गाडीवाल्यांनो चुकूनही करु नका ‘ही’ गोष्टी, नाहीतर भरावा लागेल 5 हजार रुपये दंड!

‘ही’ निर्माती का ढसाढसा रडू लागली आहे? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल