मुंबई | प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. आता केकेच्या मृत्यूदिवशी त्याच्यासोबत परफॉर्म करणाऱ्या गायिकेने धक्कादायक खुलासा केला आहे.
आजूबाजूला एवढी जास्त गर्दी पाहिल्यानंतर केके फार अस्वस्थ झाला होता आणि तो कारमधून बाहेर पडण्यासही नकार देत होता. असं असतानाही त्याने जवळपास 1 तास परफॉर्म केलं. पण त्यानंतर त्याची तब्येत जास्तच बिघडली, असं गायिका गायिका शुभलक्ष्मी डे यांनी सांगितलं आहे.
ऑडिटोरियमच्या बाहेर खूप गर्दी होती. केके संध्याकाळी आला होता. स्टेजवर आल्यानंतर त्यानं सर्वात आधी तिथल्या लाइट्स मंद करण्यास सांगितलं. जर त्याने त्यावेळी तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं असतं तर कदाचित आम्ही शो रद्द केला असता, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, केके यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जात आहे.
केके ज्यावेळी कोलकाता येथील एका कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना स्ट्रोक आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
केके यांचा मृत्यू कसा झाला यावर डॉक्टरांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार पोस्टमॉर्टमनंतर यामागचं कारण स्पष्ट होऊ शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!
“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”