Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून सुशांत प्रकरणानं एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या मृ.त्यूसंबंधित सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्येक्षदर्शी असे बरेच लोक रोज नवनविन गोष्टींचा खुलासा करत आहेत. अशातच आता सुशांतचा फार्महाऊस मॅनेजर रईस यानं एका वृत्त वाहिनीशी बोलताना अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

सुशांतच्या फार्महाऊसवर त्यानं तीन कुत्री पाळली होती. सुशांतच्या मृ.त्युच्या एक दिवस अगोदरच सुशांतनं फार्महाऊसवरील या कुत्र्यांच्या नावानं निधी पाठवला होता, अशी माहिती सुशांतचा मॅनेजर रईसनं दिली आहे. तसेच रईसनं सुशांत संबंधित इतरही काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

सुशांत ट्रीपसाठी अनेकवेळा आयर्लंडला जात होता. सुशांत बोटिंगही करत असायचा. मधल्या काळात सुशांत युरोप ट्रीपला गेला होता. मात्र, युरोप ट्रीपवरून आल्यापासून सुशांतची तब्येत ठीक नव्हती. सुशांतला नेमकं काय झालं होतं हे नाही सांगू शकत, अशी माहिती रईसनं दिली आहे.

तसेच सुशांतच्या फार्महाऊसवर झालेल्या एका पार्टीविषयीही रईसनं सांगितलं आहे. एप्रिल 2020 मध्ये रियाचं सुशांतच्या फार्महाऊसवर येणं जाणं चालू झालं होतं. एप्रिल 2020 ला सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यात आली होती. सुशांतच्या या पार्टीला रियाचे आईवडील देखील आले होते, असंही रईसनं म्हटलं आहे.

दरम्यान, एनसीबीला रियाविरुद्ध ठोस पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह अनेकांना एनसीबीनं याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. रिया चक्रवर्तीला न्यायालयानं 14 दिवसांची को.ठडी सुनावली आहे. तसेच सध्या रियाला भयखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीसह याप्रकरणातील इतर चार जणांचे न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळले आहेत. रियाचे वकील सतीश माने शिंदे हे रियाच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट

धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती

झोपडीत राहात होती मुलगी, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC परीक्षा!

सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर