Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतून अलीकडे रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये नवीन असताना आपल्याबरोबर काय गोष्टी घडल्या याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील अलीकडे बॉलीवूड मधील अं.मली पदार्थ प्रकरणामुळे सतत चर्चेत आहे. यापूर्वीही रकुल प्रीत सिंह तिच्या बिकनी लुकमुळे अनेकवेळा ट्रोल झाली आहे. रकुलनं बिकनी शूट केल्यामुळं तिला अनेक लोकांच्या प्रश्नांना सतत सामोरं जावं लागतं. मात्र, लोकांच्या या चर्चांचा रकुलला काहीच फरक पडत नाही.

रकुलला तिच्या कुटुंबाचा पाठींबा असल्यानं ती लोकांच्या चर्चांकडे लक्ष देत नाही. एका मुलाखती दरम्यान रकुलनं या गोष्टीचा खुलासा केला होता. माझ्या आई वडिलांनीच मला बिकनी लूकला पाठींबा दर्शवला आहे, असं रकुलनं या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.

रकुल 2011 मध्ये पीजेंटमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये रकुल प्रीत पाचव्या स्थानावर होती. या स्पर्धेमध्ये बिकनी घालावी लागणार हे तिला माहित होतं. या गोष्टीसाठी ती अजिबात तयार नव्हती. स्पर्धेमध्ये बिकनी घालावी लागेल या गोष्टीची तिला भीती वाटत होती.

मात्र, रकुलला यावेळी तिच्या आई वडिलांनी प्रेरित केलं होतं. यावेळी रकुलच्या आईने तिला सांगितलं होतं की, यामध्ये कोणतीही एवढी मोठी गोष्ट नाही. तू स्वतःला त्या गोष्टीसाठी तयार कर.

रकुलनं या मुलाखती दरम्यान तिच्या वडिलांबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा ती बिकनीच्या शॉपिंगसाठी जायची तेव्हा तिचे वडील स्वतः तिला सांगायचे की बिकनी गडद रंगाची घे. जास्त फिकट रंगाची बिकनी घेऊ नकोस.

रकुलनं यावेळी सांगितलं होतं की, तिचे आई वडील ऑपन माइंडेड आहेत. ती कोणत्याही गीष्टीबद्दल तिच्या आई वडिलांसोबत खुलेपणाने चर्चा करते.

दरम्यान, रकुल प्रीत सिंह शेवटच्या वेळी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानं सुमारे 64 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!

भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?

आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!

कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या गायकाचं नि.धन, मोदींनीही शोक व्यक्त केला