धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्री मधील अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

सुशांत आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांनी अं.मली पदार्थांविषयी बातचीत करण्यासाठी व्हाॅट्सअॅपवर एक ग्रुप काढला होता, अशी माहिती समोर आली आहे. या ग्रुपमध्ये सुशांत आणि रियासह सुशांतच्या घरचा स्टाफ सामील होता. मुंबईतील कॅपरी हाईट्स येथील सुशांतच्या जुन्या घरी असतानाच हा ग्रुप बनवण्यात आला होता.

या ग्रुपवर फक्त अं.मली पदार्थांविषयी बातचीत केली जात होती. रिया आणि सुशांतला जेव्हा केव्हा अं.मली पदार्थांची आवश्यकता असेल तेव्हा ते या ग्रुपवरून बोलत असत. रिया चक्रवर्तीनं एनसीबीच्या चौकशी दरम्यान या ग्रुपविषयी माहिती दिली होती.

सुशांत प्रकरणी तपास करताना सीबीआय आणि ईडीच्या हाती देखील या ग्रुपची माहिती लागली होती. माहितीनुसार, सुशांतच्या घरातील कर्मचाऱ्याकडं अं.मली पदार्थ ठेवलेले असायचे. सुशांत आणि रियाला जेव्हा गरज लागेल तेव्हा ते या ग्रुपवर मेसेज करायचे आणि ड्र.ग्ज मागवायचे.

दरम्यान, एनसीबीला रियाविरुद्ध ठोस पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह अनेकांना एनसीबीनं याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. रिया चक्रवर्तीला न्यायालयानं 14 दिवसांची को.ठडी सुनावली आहे. तसेच सध्या रियाला भयखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीसह याप्रकरणातील इतर चार जणांचे न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळले आहेत. रियाचे वकील सतीश माने शिंदे हे रियाच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

झोपडीत राहात होती मुलगी, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC परीक्षा!

सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…

“शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात; मग मराठा आरक्षण का दिलं नाही?”