धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली| सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांचा आकडा अतिशय वेगाने वाढत आहे. त्यातच प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि जेष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

पत्रकार रोहित सरदाना यांच्यावर दिल्लीत कोरोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

रोहित सरदाना यांच्या निधनाचे ट्वीट करताना चौधरी यांनी म्हटले की, ‘थोड्यावेळापूर्वी जितेंद्र शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी जे म्हटले ते ऐकून माझे हात कापायला लागले. ती आमचे मित्र आणि माजी सहकारी रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी होती. हा व्हायरस आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जाईल याची कल्पना नव्हती. या दुःखद बातमीसाठी मी तयार नव्हतो. हे देवा हा अन्याय आहे. ॐ शान्ति.’

रोहित सरदाना आज तकसोबतच या अगोदर झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं आहे. आज तकवर त्यांचा दंगल हा कार्यक्रम लोकप्रिय होता.

2018 मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीदेखील सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘दोस्ताना 2’ नंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन…

‘मला आणि माझ्या कुटूंबाला भाजपकडून जीवे मारण्याच्या…

IPl 2021: पृथ्वी शाॅच्या झंझावती खेळीमुळे दिल्लीचा कोलकातावर…

इरफान खानला झाला होता मृत्यूचा आभास; शेवटचा श्वास घेत…

सावधान! कोरोनाची लक्षणं असतानाही ‘या’ कारणांमुळे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy