मुंबई | कोरोना महामारी नंतर देशातील आणि महाराष्ट्रातील शाळा पुन्हा प्रगती प्रथावर आल्याचं पहायला मिळालं. शाळा पुन्हां सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शाळेतील गेलं की शाळेतील नियम व अटी आसतात, विद्यार्थ्यांचे केस, गणवेश व्यवस्थित आहे का नाही हे शिक्षकांकडून तपासण्यात येत आहे. केस व नखे वाढली असतील तर विद्यार्थ्यानी कापून यावीत, असं शाळेचा नियम असतो.
अशातच आता कणकवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कणकवलीत एका विद्यार्थ्यांला शिक्षकांकडून बेदम मारहाण केली असल्यांच आरोप करण्यात आला आहे.
पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.
या घटनेने खळबळ उडाल्याचं पहायला मिळालंय. विद्यार्थ्यीच्या वडिलांनी अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराविरोधात नॅशनल हेल्पलाईन 1098 या चाईल्ड लाईनवर आपबिती सांगितली.
त्यामुळे चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत दाखल होत त्यांच्या घरी जात मारहाण झालेल्या विद्यार्थ्याची विचारपूस केली.
तसेच हा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्येही जात संबंधित शिक्षकांकडे याबाबत चौकशी केली असता या विद्यार्थ्याला मारहाण झालीच नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आधी देखील असा प्रकार उघडकीस आला होता. दोन वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडल्याने पालकांनी शिक्षकाविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर
“स्त्रीयांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल”
Gold Rate: आजचे सोन्याचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी
मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं