धक्कादायक! जन्मदात्यानेच पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार करत कुटुंबियांसोबत केलं ‘हे’ कृत्य

पुणे |  पिंपरी-चिंचवडमधील आळंदीतील ठाकरवस्ती येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाला कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी देत पित्यानेच मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी पित्याला अटक केली आहे.

आळंदीमधील ठाकरवस्ती येथे फिर्यादी अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. 31 जुलै रोजी रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास आरोपी पित्याने मुलगी अल्पवयीन असताना देखील तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. घडलेला प्रकार जर कोठे सांगितला तर पत्नी आणि मुलाला कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी पिता आपल्या आई आणि भावाला मारेल म्हणून अल्पवयीन मुलगी फिर्याद देण्यास घाबरत होती. आरोपी घरातून बाहेर जाताच मुलीने तातडीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तीने घडलेला सर्व प्रकार आळंदी पोलिसांना सांगितला.

आळंदी पोलिसांनी संबंधित आरोपी पित्याविरुद्ध स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यासोबतच कुटुंबीयांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला

…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…