धक्कादायक! मेट्रो जाताना अचानक कोसळला पूल अन्, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. अशातच एक धक्कादायक घटना घडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मॅक्सिकोमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. मॅक्सिको सिटीमधील एलविटेड मेट्रो लाईन कोसळल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये जवळपास 23 जणांचा मत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना रोडवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचत कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून गाड्या चाललेल्य आहेत. मात्र अचानक त्या रोडवरचा पूल कोसळतो, आणि त्यावर चाललेली मेट्रो खाली चाललेल्या गाड्यांवर पडताना दिसतं आहे.

मेक्सिको शहरातील मेअर क्लाऊडिया शिवबाऊन यांनी मीडियाला सांगितलं की, या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे या अपघातात तब्बल 70 जणं जखमी झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तसेच या अपघातामध्ये मेट्रोचंही खूप नुकसान झालं आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘@heraldodemexico’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 10 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती चक्क सिंहाशी भिडली…

पुणे हदरलं! तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा…

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवली अद्दल,…

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना पळवून लावण्यासाठी तरूणाने…