बंगळुरु| देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.
राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनाचं संकट दूर व्हावं म्हणून कुणी होम-हवन करतंय, तर कुणी देवाला नवस बोलतंय. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत कोरोनामुक्तीसाठी संघर्ष आणि प्रार्थना सुरू आहेत. अशातच कर्नाटकच्या बेळगावमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता.
कोरोना रोखण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना कोन्नूर येथे उघडकीस आली आहे. बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेला हा घोडा एका आश्रमाशी संबंधित होता. त्यामुळं धार्मिक भावनेतून या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं.
गावातीलच मरडी मठात त्या ‘मृत’ घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील शेकडो नागरिक उपस्थित राहिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
अंत्ययात्रेवेळी गर्दी करु नका, असे आवाहन करुनही शेकडो ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने संबंधित 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मरडी मठही 14 दिवस बंद करण्यात आला असून अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाईल, असे बेळगावचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
आश्रमातील या घोड्याची आधी पुजा करण्यात आली होती. त्यानंतर जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली. घोड्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारापूर्वी पावदेश्वर स्वामी यांनी पुजा केली होती. त्यानंतर या घोड्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH Hundreds of people were seen at the funeral of a horse in the Maradimath area of Belagavi, yesterday, in violation of current COVID19 restrictions in force in Karnataka pic.twitter.com/O3tdIUNaBN
— ANI (@ANI) May 24, 2021
महत्वाच्या बातम्या –
2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट…
‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…
चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…