बंगळूरू | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय धक्कादायक ठरलं आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता या नावांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता सुरेंद्र बंतवाल याची दिवसाढवळ्या ह.त्या करण्यात आली आहे.
बुधवारी सुरेंद्र बंतवाल यांच्या राहत्या घरी त्यांचा मृ.तदेह मिळाला आहे. बंतवाल यांच्या शरीरावर चाकूचे वा.र देखील पोलिसांना आढळले आहेत. बंतवाल यांच्या ह.त्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार काही अज्ञातांनी आर्थिक वादामुळे त्यांची ह.त्या केली आहे. सध्या कर्नाटक पोलीस याप्रकरणी शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी रात्री सुरेंद्र बंतवाल यांच्याबरोबर कोण होतं इथून आम्ही आमची चौकशी सुरु करु. बंतवाल यांच्यावर धारधार वस्तूने वार करत त्यांची ह.त्या करण्यात आली आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
सुरेंद्र बंतवाल यांच्या ह.त्येमुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर एकच शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी बंतवाल यांच्या मृ.त्यूचे दुःख व्यक्त केलं आहे. बंतवाल यांचं कुटुंब देखील शोकसागरात बुडालं आहे.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी बंतवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांसोबत दिसले होते. यावेळी बंतवाल यांच्या हातात एक तलवार होती. बजरंग दलाचे कार्यकर्ते भूविथ शेट्टी यांच्यसह ते या व्हिडिओमध्ये दिसले होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंतवाल यांना अ.टक करण्यात आली होती. यावेळी बंतवाल यांची भाजप कार्यकर्त्यांबर झटापट झाली होती. त्यामध्ये भाजपचे गणेश आणि पुष्पराज यांच्यसह दोन कार्यकर्ते देखील ज.खमी झाले होते.
नुकतीच बंतवाल यांची जा.मिनावर सुटका झाली होती. मात्र, जेलमधून बाहेर येताच त्यांची अज्ञात व्यक्तींनी ह.त्या केली आहे.
दरम्यान, ‘चली पोलीलू’ या हिट चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. तसेच सवर्ण दीर्घ संधी या कन्नड चित्रपटात देखील त्यांनी काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला
‘भाजपनं माझं विधानसभेचं तिकीट नाकारलं तेव्हाच राष्ट्रवादीनं मला…’; पक्ष सोडताच खडसेंचा गौप्यस्फोट
“एकनाथ खडसे तेव्हा आम्हाला शिव्या घालत होते” – शरद पवार
सामन्यात पराभव पत्कारूनही धोनीनं विरोधी टीमच्या खेळाडूला दिलं ‘हे’ गिफ्ट; वाचा काय आहे यामागील कारण
भाजपला आणखी मोठा धक्का! खडसेंनंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याही राष्ट्रवादीत जाणार