धक्कादायक! कोरोनाची लस घेतली अन् HIV इन्फेक्शन झालं?

कॅनबेरा | गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ या लशीवर संशोधन करत आहेत. काही देशांमध्ये या लशीचं वितरण सुरु करण्यात आलं आहे. तर काही देशांमध्ये  याच्या ट्रायल सुरु आहेत.

काही लशींच ट्रायल अर्ध्यात थांबवण्यात आलं आहे. तर काही लशी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील कोरोनावरील एका लशीचं क्लिनिकल ट्रायल सध्या थांबवण्यात आलं आहे. कारण ही लस घेतल्यानंतर HIVचं इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं आहे.

ऑस्ट्रेलियातील क्विंसलँड युनिव्हर्सिटी आणि सीएसएल कंपनीद्वारे तयार करण्यात आलेली ही लस आहे. जुलै महिन्यापासून या लशीचं परीक्षण सुरु आहे. ट्रायल दरम्यान या लशीचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. मात्र, चाचणी केल्यानंतर ट्रायलमधे सहभागी व्यक्तींना HIV झाल्याचं निदर्शनास आलं आहे. यामुळे या लशीचं ट्रायल तातडीनं थांबवण्यात आलं आहे.

मात्र सीएसएलने दिलेल्या माहितीनुसार, ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या 216 लोकांवर कोणत्याही प्रकारचा गंभीर दुष्परिणाम दिसून आला नाही. मात्र, रिपोर्टमध्ये या लोकांना एचआयव्ही असल्याचं दिसून आलं. मात्र पुढे तपासणी केली असता त्या व्यक्तींना प्रत्यक्षात एचआयव्ही नव्हताच. लशीमुळे शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या आणि एचआयव्ही संक्रमणाचे चुकीचे रिपोर्ट येऊ लागले, असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे.

दरम्यान, ब्रिटन या देशाने व्यापक वापरासाठी बनवलेल्या ‘फायझर-बायोएनटेक’च्या कोरोना व्हायरसवरील लसीला मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसवरील लस मंजूर करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश बनला आहे.

ब्रिटन मधील लोकांना ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकी फार्मा कंपनी ‘फायझर’ आणि जर्मन कंपनी ‘बायोएनटेक’ या कंपन्यांनी एकत्र मिळून ही लस बनवली आहे.

या लसीविषयी माहिती देताना ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीची शिफारस स्वीकार करत सरकारने फायझर-बायोएनटेक च्या कोव्हिड-19 व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे.

तसेच कोरोना वरील या लसीवर स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कोरोनावर 95 टक्के सुरक्षा देणारी ही लस एकदम सुरक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कृषी मंत्र्यांचं कृषी विधेयकावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

“राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र; शरद पवारांचं नाव त्याच कटाचा भाग”

टोल नाक्यावर गाडी आडवली म्हणून थोबाडीत मारली; ‘या’ महिला नेत्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

‘UPA प्रमुख म्हणून माझी निवड होणार..’; UPAच्या अध्यक्ष पदावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य!