सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई आणि बिहार पोलीसांनंतर सीबीआय आणि एनसीबीसारख्या देशातील  उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत आहेत.

सुशांत प्रकरणातील गुंता सुटत असतानाच यात अचानक नवीन ट्वीस्ट येत आहेत. अशातच आता सुशांत प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतला न्याय मिळावा म्हणून झटणाऱ्या सुशांतच्या प्रियंका आणि मितू या दोन्ही बहिणींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या बहिणींविरोधात रियानं दाखल केलेल्या एफआयआरमुळे सुशांतच्या बहिणी आता ग.जाआड जाण्याची शक्यता आहे.

सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

या औषधांमुळे सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असंही रियानं दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपविली आहे. यामुळे लवकरच सुशांतच्या बहिणींना अ.टक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशांत प्रकरणी रियानं दाखल केलेल्या एफआयआरमुळे प्रियंका आणि मितूला अ.टक होऊ शकते. यामुळे या दोघींनी मुंबई उच्च न्यायालयात रियानं दाखल केलेल्या एफआयआर विरोधात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करावी, अशी मागणी प्रियंका आणि मितूनं केली आहे.

रियां चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रियंका आणि मितूवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच सुशांतच्या बहिणींनी एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयानं रद्द करावी, अशीही मागणी रियाच्या वकिलांनी केली आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री सारा अली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन यांचीही एनसीबीनं याप्रकरणी चौकशी केली आहे. एनसीबीनं याप्रकरणी अनेकांना ग.जाआड देखील केलं आहे.

रिया चक्रवर्ती विरोधी अं.मली पदार्थ प्रकरणी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं तिला अ.टक केलं होतं. 29 दिवसांच्या को.ठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं रिया चक्रवर्तीचा सशर्त जामिन मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या वाटेवर? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं अनेकजण गोंधळात

सुशांत प्रकरणी दीपिकाला मोठा धक्का! ‘या’ व्यक्ती विरोधात होणार कारवाई

‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?

‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…

करीनानं शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूरचा फोटो! नक्की कनेक्शन काय आहे?