…तर मी सेहवागला सोडलंच नसतं- शोएब अख्तर

मुंबई : प्रत्येक क्रिकेटप्रेमींला सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग याची मैदानावरील फटकेबाजी माहीत आहे. तर सेहवाग मैदानाबाहेर सुध्दा आपल्या बोलण्यातून फटकेबाजी करतो हे देखिल सर्वांना परीचित आहे. असाच एक किस्सा सर्वांच्या आठवणीत आहे तो म्हणजे 2003 च्या विश्वचषकात मुलतानमधील मैदानावर घडलेला  तो किस्सा क्रीडा रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. तो किस्सा म्हणजे बाप बाप होता है परंतू असा काय किस्सा घडलाच नव्हता असा दावा पाकिस्तानी क्रिकेटपटु शोएब अख्तरने केला आहे.

शोएब अख्तरने Helo app वर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी बातचित केली. या लाईव्हमध्ये शोएब अख्तरला सचिन-सेहवागच्या ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ या किश्श्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा असे काही झालेच नव्हते, हे सर्व खोटे आहे, सेहवाग खोटं बोलतोय असं शोएब अख्तर म्हणाला,आणि जर  मैदानावर असे काही झाले असते, तर मी सेहवागला सोडले नसते, असेही शोएब अख्तर म्हणाला.

बाप बाप होता है, हा किस्सा होता तरी काय?

“शोएब मला गोलंदाजी करत होता. मला बघून बघून तो थकला होता. त्याने विचार केला, शिव्या दिल्या तर मी आऊट होईन. त्याने बाऊन्सर टाकायला सुरुवात केली. प्रत्येक बॉलनंतर बोलायचा, हुक मारुन दाखव. तर एका ओव्हरनंतर मला वाटलं, आता तो असेच चेंडू मला टाकेल. मी बोललो, तो तुझा बाप (सचिन तेंडुलकर) तिथे नॉन स्ट्राईकर एंडला उभा आहे. त्याला सांग, तो (हुक) मारेल. तिथे सचिन तेंडुलकर होता” असं सेहवागने शाहरुख खानला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने पुन्हा बाऊन्सर टाकला आणि सचिनने सिक्सर मारला. ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ असा किस्सा घडल्याचं सेहवाग सांगतो. परंतू तो किस्सा घडलाच नाही असं शोएब म्हणत आहे. दरम्यान या वक्तव्यावरुन शोएब नेटकऱ्यांकडून चांगलाच  ट्रोल होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर

-‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं

-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी

-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

.