5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं चिंतेत भर पाडली आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकही आता या कोरोनाला हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमही कठोर केले आहेत. अशातच आता पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याविषयी केंद्र सरकारनं नवे नियम जारी केले आहेत.

पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे, कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता, 18 वर्षांखालील मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी अॅंटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही.

आई-वडिलांच्या देखरेखीत 6 ते 11 वयोगटातील मुले सुरक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात. केंद्र सरकारने गुरुवारी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

कोरोना आणि ओमिक्राॅनचा संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकानं आपल्या मार्गदर्शक तत्तवांमध्ये सुधारणा केली आहे.

भारतासह इतर अनेक देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे.

सध्या पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी चिंतेत आहेत. जरी अनेक शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी मुलांना अजूनही ओमिक्रॉनची भीती आहे. त्यामुळे मुलांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं आढळल्यास पालकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  T20 World cupचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने सामने

  ‘…त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

  एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

  ‘या’ ठिकाणी शाळा बंदच राहणार, धडकी भरवणाऱ्या आकडेवारीनं चिंतेत भर

  गोडसेच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले “एक कलाकार म्हणून…”