सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अं.मली पदार्थांच सेवन आणि व्यापार या आरोपाखाली अ.टक केलं आहे. तसेच एनसीबीनं रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह इतरही काही जणांना अं.मली पदार्थ प्रकरणी ताब्यात घेतल आहे. अशातच आता याप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी शौविकच्या मोबाईल मधील अनेकांबरोबर शौविकनं केलेले ड्र.ग्ज चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. या व्हाट्सअॅप चॅट्समध्ये आता आणखी एक महत्वाचं नाव समोर आलं आहे. शौविक चक्रवर्तीनं ड्र.ग्ज संबंधित अनुज केशवाणी बरोबरसुद्धा व्हाट्सअॅपवरून संवाद साधला होता, अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

शौविक आणि अनुज केशवाणी दरम्यान झालेल्या या चॅटमध्ये ते दोघे अं.मली पदार्थांच्या डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. तसेच या चॅटमध्ये अं.मली पदार्थांचे काही फोटोही शेअर करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

सुशांतप्रकरणी शौविकच्या मोबाईल मधील नव्यानं हाती लागलेल्या या चॅटमुळं सुशांत प्रकरणाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सुशांत प्रकरणात एनसीबीची टीम अतिशय वेगानं तपास करत आहे. याप्रकरणी अनेक मार्गांनी दिवसेंदिवस नवनविन खुलासे होत आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती या दोघांना हाय क्वालिटीचे ड्र.ग्ज आवडत होते. हाय क्वालिटीचे हे ड्र.ग्ज भारतात इंपोर्ट केले जात होते. ड्र.ग्जची ऑर्डर रिया चक्रवर्ती देत होती. मात्र, रिया जे ड्र.ग्ज बाहेर देशातून मागवायची ते ड्र.ग्ज मुंबईतील सुशांतच्या घरच्या पत्त्यावर येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिया आणि सुशांतला अतिशय उच्च दर्जाच्या ब.ड्सचं सेवन करायला आवडत होतं. रिया ऑर्डर करत असणाऱ्या या ब.ड्सच उत्पादन कॅनडा, युके आणि नेदरलँडमधील एम्सटर्डम या शहरात होते. जगात या तीन देशांमध्येच सर्वात महाग आणि उच्च प्रतीचे ब.ड्स मिळतात. उच्च प्रतीचे हे ब.ड्स त.स्करी करून भारतात आणले जातात, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रुग्णवाहिका चालकानं दिशाच्या मृ.तदेहाबाबत दिली धक्कादायक माहिती म्हणाला…

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; सलमान खान, करण जोहरसह 8 बड्या सेलिब्रेटींना…

मृ.त्यूआधी दिशानं 100 नंबरवर फोन केला होता का?; पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा

उदयनराजे की संभाजीराजे?, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व कुणी करावं?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत उचललं ‘हे’ मोठं पाऊल!