औरंगाबाद | शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ (Shirdi Sai Baba) बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच येत्या दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करा, असेही निर्देश औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.
या कारवाईमुळे महाविकास आघाडीला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. 2019 साली राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) स्थापन झाले होते. यावेळी आघाडी सरकारने 16 विश्वस्तांची नेमणूक साईबाबा संस्थानावर केली होती.
परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सदर विश्वस्तांची नेमणूक ही नियमावलीला धरुन नसल्याचे सांगत यावर आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी माजी विश्वस्त उत्तम शेळके (Uttam Shelake) यांनी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ही नेमणूक अयोग्य आणि नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करत औरंगाबाद खंडपीठाने हे विश्वस्तमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिर्डी संस्थानाला नवे विश्वस्त मंडळ मिळणार आहे.
आज (13 सप्टेंबर) औरंगाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी धानुका (R. D. Dhanuka) आणि न्यायामूर्ती एस. जी. मेहरे (S. G. Mehare) यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी हा महत्वाचार निर्णय घेण्यात आला.
नवीन विश्वस्तमंडळाची नेमणूक होईपर्यंत त्रिसदस्यीय समिती संस्थानाचे कामकाज पाहणार आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या समितीत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
“…तर हा आशिष शेलार सुद्धा कुरेशी”; आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल
“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांवर दादर पोलिसांची मोठी कारवाई
शिवसेना कोणाची खटला: शिंदे गटाची नवीन खेळी, शिवसेना अडचणीत
इलेक्ट्रीक वाहणांसाठी येत्या 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम; नितीन गडकरींची मोठी घोषणा