ठाकरे सरकारने दणका दिल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणतो…

अहमदनगर |  छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली आहे. त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर माध्यमांसमोर येत छिंदमने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर महापालिकेकडून मला आताच आदेशाची प्रत मिळाली आहे. प्रत मिळाल्यानंतर मी आदेश वाचला आहे. आदेश वाचल्यानंतर तो योग्य की अयोग्य? हे सध्यातरी बोलणं उचित नाहीये. मंत्र्यांसमोर जे कामकाज आलं त्यांनी केलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर माझा कोणाविरोधातही द्वेष नाहीये, असं छिंदम म्हणाला आहे.

सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जायचं की नाही हे मी आणखी ठरवलेलं नाहीये, असं छिंदमने यावेळी सांगितलं. सरकारने घेतलेल्या निर्णयावर छिंदमने अधिक काही बोलण्यास नकार दिला.

महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदम या सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्यांची वाट न पाहता नगरविकास विभागाने आपला निकाल सुनावला.

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. महापुरुषांच्या नावाने राज्याच्या प्रशासनाचे काम चालते. लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल अशाप्रकाराची वक्तव्य केली जात असतील तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असं निकालावेळी नगरविकास विभागाने सांगत छिंदमचं नगरसेवक पद काढून घेण्याचा निर्णय दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण धोक्यात- देवेंद्र फडणवीस

-भाजपचं राज्यसभेसाठी एका नावावर शिक्कामोर्तब; दुसऱ्या नावाची उत्सुकता

-ऐन लग्न सराईत सोनं भाव खाणार…. तोळ्याला मोजावे लागतील तब्बल एवढे रूपये!

-कोरोना व्हायरस गुंतवणूकदारांच्या मुळावर; दिवसभरात साडे पाच लाख कोटींना चुना!

-महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी तुमचा आवडता खासदार कोण? सुप्रिया सुळेंचं लक्षवेधी उत्तर