मुंबई | शिंदे सोबत जाण्याबाबत ठाकरेंना मेसेज केला. त्यांचा फोन आला. त्यात युतीची मागणी केली. शिवसंपर्कचा अहवाल देखील दिला त्यात सुद्धा ही मागणी पुढे आली होती, उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) शेवटपर्यंत चर्चा करत होतो. मात्र त्यांनी सांगितलं तुम्हांला योग्य वाटेल ते करा मग शिंदे गटात जायचा निर्णय घेतला, असं मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं आहे.
शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आज श्रीरंग बारणे पुण्यात आले. यावेळी विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका केली आहे.
भाजप सोबत युती पाहीजे ही आमची भूमिका होती, वारंवार ही मागणी केली. मात्र मविआ आली. राष्ट्रवादीला सेनेला संपवायचं आहे म्हणून हे पाऊल उचललं, असं त्यांनी सांगितलं आहे.
माझ्या विजयात भाजपचा 60 ते 70 टक्के वाटा होता, त्यामुळे कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर कोर्टाच्या निर्णयाचं पालन करणार, आमचा निर्णय झालेला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मावळ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आहे, पण त्यावर सेनेने विरोध केला नाही, तसं होऊ शकते असं वाटलं. परंतु शिंदे गटात जाण्याचा त्याच्याशी संबंध नाही, असं बारणेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आगामी निवडणुकांबाबत रावसाहेब दानवेंचा सर्वात मोठा दावा!
“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”
‘एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता, तरीही…’; बंडखोर आमदाराच्या आरोपाने खळबळ
“उद्धव ठाकरेंनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेला 10% मी संपवणार”
विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी