Top news मनोरंजन

सुशांतनं आत्मह.त्याच केली होती हे समोर आल्यानंतर सुशांतची बहिण म्हणतेय…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीबीआय टीम सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीम सुद्धा सुशांत प्रकरणातील सर्व फॉरेन्सिक रिपोर्टसची फेर तपासणी करत होती.

एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं सुशांत प्रकरणातील अंतिम अहवाल सीबीआयकडे सोपविला आहे. सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे.

सुशांत प्रकरणी एम्सच्या टीमनं महत्वाचे मेडिकल रिपोर्ट सीबीआयकडे सोपविल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता कीर्ती सिंहनं याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. किर्ती सिंहनं याबाबत एक ट्विट केलं आहे. किर्ती सिंहनं या ट्विटमध्ये एम्सच्या रिपोर्टचा कुठेही उल्लेख केला नाही. तिनं केवळ दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

‘आम्ही जिंकणार!’ असं ट्विट श्वेता सिंहनं केली आहे. या ट्विट सोबत श्वेतानं सुशांत सिंह राजपूतचा फोटो देखील दिला आहे. सुशांतच्या मृ.त्यूपासून श्वेता सिंह सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे. एक ना एक दिवस आपल्या भावाला न्याय नक्की मिळणार, असा विश्वास श्वेताला आहे.

सुशांत प्रकरणी संपूर्ण घटनेचा अभ्यास करत एम्सच्या डॉक्टरांनी अंतिम अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत. सुशांतच्या श.ववि.च्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नोंदविण्यात आलेली वेळ, सुशांतच्या गळ्यावर आढळलेले लिगेचर मार्क्स आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून एम्सनं हा अंतिम रिपोर्ट तयार केला आहे.

सुशांत सिंह राजपुतचा 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी मृ,तदेह आढळला होता. यानंतर मुंबई पोलीसांनी सुशांत प्रकरणी तपास सुरू केला होता. मात्र, सुशांतच्या कुटुंबाने बिहारमध्ये एफआयआर नोंदविल्यामुळे बिहार पोलिसांनीही याप्रकारणी शोध सुरू केला होता. यानंतर मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं होतं.

मुंबई आणि बिहार पोलिसांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविलं होतं. सुशांतनं आ.त्मह.त्या केली नसून सुशांतची ह.त्त्याच करण्यात आली होती, असा आ.रोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी आत्तापर्यंत अनेकांना ग.जाआड टाकलेलं आहे. तसेच बॉलिवूड मधील अनेक दिग्गज सध्या अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या रडारवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…