मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या कुटुंबासह टेलिव्हिजन इंडस्ट्री, सिद्धार्थचे मित्र, त्याचे चाहते सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत. हे दु:ख पचवणे अनेकांसाठी अवघड झाले आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री शहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नाहीए. या गोष्टीचे सर्वात जास्त दु:ख शहनाजला झाले आहे. अशातच आता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एक बातमी समोर आली आहे.
सिद्धार्थ आणि शहनाज हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होतेच परंतु हे दोघे लवकरंच लग्न करणार होते, अशी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थच्या एका मित्राने याबद्दल खुलासा केला आहे.
सिद्धार्थ आणि शहनाजने आपल्या कुटुंबियांना आपल्या नात्याबद्दल सांगितलं होतं. या दोघांना गुपचूप साखरपुडा देखील उरकला होता. दोघांनीही आपल्या साखरपुड्याची कोणाला भनक देखील लागू दिली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
तसेच येत्या डिसेंबरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज दोघे लग्न करणार होते. या दोघांनी आपल्या लग्नाची तयारी देखील चालू केली होती, अशीही माहिती सिद्धार्थच्या मित्राने दिली आहे.
दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.
या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.
महत्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…
ऐकावं ते नवलंच! चक्क पक्षी रडतोय लहान बाळासारखा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ
डान्स करायच्या नादात चक्क टीव्हीच घेतला अंगावर, पाहा चिमुकलीचा मजेशीर व्हिडीओ
अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ