मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. सिध्दार्थच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिध्दार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच आता अभिनेत्री राखी सावंतने सिद्धार्थच्या मृत्यूविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
सिद्धार्थचा मृत्यू हा इतर कलाकारांसारखा राखी सावंतसाठी देखील मोठा धक्का होता. सिद्धार्थच्या निधनांनंतर राखीने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. या व्हिडीओत राखीने सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला नसल्याचं म्हटलं आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूविषयी बोलताना राखी म्हणाली की, सिद्धार्थच्या मृत्यूमुळे मला मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकल्यानंतर मला घरातून बाहेर पडणं देखील शक्य होत नाही. परंतु नुकतंच मला समजलं की सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला नाही.
तब्बल साडेतीन तास वेगवेगळ्या डॉक्टरांनी सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या रिपोर्टमध्ये सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झालाच नाही, असं सांगितलं आहे. सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकारामुळे नाही तर मग कशामुळे झाला आहे, असा सवाल राखीने उपस्थित केला आहे.
तसेच सिद्धार्थच्या BMW कारच्या काचा देखील फुटल्या आहेत. त्याचं कोणाशी भांडण झालं होतं का? सिद्धार्थ साडेआठच्या सुमारास कोणाला तरी भेटायला गेला होता, असं सांगितलं जात आहे. हे देवा नेमकं सत्य काय आहे, असं देखील राखीने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थने 2004 साली आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरूवात केली होती. सिद्धार्थला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. परंतू त्याच्या लूकमुळे केवळ आईच्या सांगण्यावरून त्यानं एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तिथून त्याच्या करिअरला सुरूवात झाली.
डिसेंबर 2005मध्ये तुर्कीमध्ये मॉडेलिंगची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये आशिया लॅटिन, अमेरिका, यूरोपमधील एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता. या 40 जणांना मागे टाकत सिद्धार्थने जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलंच विजेते पद पटकावलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
शाईनिंग करत स्टंट करायला गेला अन्…,पाहा व्हिडीओ
लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ