मुंबई | अभिनेता आणि मॉडल सिद्धार्थ शुक्ला याचे काल म्हणचेच गुरूवार 2 सप्टेंबर रोजी अकाली निधन झाले. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे चित्रपट आणि टीव्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला बसला आहे.
सिद्धार्थने मृत्यूच्या आधल्या रात्री काही औषधांचे सेवन केले होते. त्यानंतर झोपायला आपल्या बेडरूममध्ये गेला. मात्र सकाळी त्याला उठता आले नाही. हे लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला मुंबईतील कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
त्याची तपासणी केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धात एवढा फिट असूनही त्याला कसा काय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशा अनेक प्रकारचे सवाल केले जात आहेत.
परंतू अशातच सिद्धार्थचा जिम ट्रेनर सोनू चौरसिया याने एक वक्तव केलं आहे. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
सिद्धार्थला मी गेल्या दीड वर्षापासून ट्रेनिंग देत होतो. तो फिट होता आणि तो त्याच्या फिटनेसबाबत खूप जागकही होता. त्याचबरोबर तो जिममध्ये खूप हार्डवर्क करत असल्याचंही सोनू यांनी सांगितलं. न्यूज 18च्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये ते बोलत होते.
सोनू यांनी सांगितले की, सिद्धर्थ कधीच ताणतणावामध्ये नव्हता. तो नेहमी आनंदी असायचा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवणारा माणूस होता. आम्ही रोज 10.30 वाजता जिममध्ये भेटायचो.
तसेच मला काल सकाळी एक कॉल आला आणि सिद्धार्थच्या मृत्यूबाबत समजले. त्यावेळी पहिल्यांदा माझा यावर विश्वास बसला नाही. परंतू नंतर मला अनेक कॉल यायला सुरूवात झाली. सकाळी तो उठला नसल्यामुळे त्याची आई त्याला उठवायला गेली. त्याची तब्येत जास्तच खराब असल्यामुळे सिद्धार्थला रूग्णालयात घेऊन जाण्यात आले.
परंतू रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आहे. पंरतू त्याचा मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने होऊ शकत नाही त्यामुळे मला त्याच्या पोस्टमार्टमची प्रतिक्षा असल्याचं सोनू यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार
चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ
काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर