महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

मुंबई |  देशासह महाराष्ट्रात अनेक विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची म्हेत्रे यांनी भेट घेतली आहे.

म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबतची पूर्वकल्पणा दिली आहे, अशी माहिती कळतीये. म्हेत्रे यांच्याबरोबर सोलापूर काँग्रेसचे अनेक आजी माजी पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळतीये.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी म्हेत्रे भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा हाच दावा खरा ठरताना दिसून येत आहे.

आमदार सिद्धराम म्हेत्रे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. म्हेत्रे यांनी जर भाजपात प्रवेश केला तर काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

-“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”

-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

-स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली

IMPIMP