केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

नवी दिल्ली | केंद्र सरकार वेळोवेळी आपल्या योजनांमध्ये बदल करत असतं. योजनांना अधिक लोकाभिमूख करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

केंद्रीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात पीएफचा लाभ घेत असतात. पीएफ हा सर्व कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. परिणामी या योजनेतील बदलाचा फायदा आणि तोटा थेट ग्राहकांना होतो.

फॅमिली पेन्शनबाबत सरकारनं आता नवीन नियम जारी केले आहेत. या नियमाच्या माध्यमातून आता सरकार पेन्शनधारकांच्या घरच्यांना देखील फायदा देणार आहे.

मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही फॅमिली पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हा नवा नियम आता लागू होणार आहे. परिणामी आता पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.

मानसिक विकारानं त्रस्त असलेल्या मुलांनाही पेन्शनचा लाभ मिळणं गरजेचं आहे. मानसिक आजारानं त्रस्त मुलांना फॅमिली पेन्शन न मिळाल्यानं त्यांच्या संगोपनात अडचणी येतात.

राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना मदतीची गरज असते. त्यांना पेन्शनची मदत न मिळाल्यानं इतरांवर अवलंबून राहावं लागत असल्यानं अडचणी येत होत्या. पण आता त्या अडचणी दूर होणार आहेत.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारतर्फे सर्व पेन्शनधारकांच्या मुलांना त्यांचा अधिकार देणार असल्याची माहिती दिली आहे. फॅमिली पेन्शनमध्ये नाॅमिनेशन असेल तर त्या मुलांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

मानसिक विकारांनी त्रस्त असणाऱ्या मुलांना बॅंकांनी लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात सरकारनं बॅंकांना निर्देश दिल्याचं जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”

शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध