मुंबई | महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये कोणत्याना-कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपांची खेळीही सुरूच असते.
अशातच शिवसेनाच्या ‘सामना’मध्ये आज दसऱ्यानिमित्त एक अग्रलेख लिहीला आहे. त्यामध्ये विरोधी पक्षावर चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेढरासारखी झाली आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्य ऐकूण नागरीकांची खूपच करमवणूक होत आहे. तसेच पुन्हा धाड प्रयोगही सुरूच आहे. या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र काढावीच लागणार, अशा सूचक इशाराही विरोधकांना देण्यात आला आहे.
ठाकरे सरकारला गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात काम करत आहे. तेव्हापासून हे सरकार नीट चालू नये यासाठी दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप चालवला आहे.
विरोधकांनी पाठीत वार करायची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. परंतू बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत. महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून धोका असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
“…तर शिवसेनेचे 56 आमदार त्यावेळी तुमच्यासोबत दिसले असते”
“चित्र वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं”