नवी दिल्ली | आपल्या गोड गळ्याने आणि मनमोहक आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या घायाळ करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर…! तिची बालपणाची परिस्थिती तर तिने अनेक वेळा शोमध्ये बोलून दाखवली आहे. तिने ती परिस्थिती कधी लपवली नाही. मात्र आपल्या गायकीच्या जोरावर तिने त्या परिस्थितीला हरवत आता स्वप्नातलं घर घेतलं आहे.
इन्स्टाग्रामवर नव्या घराचा फोटो तिने शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी तिने दिली आहे. तसंच बालपण घालवलेल्या जुन्या घराचा फोटो देखील तिने शेअर केला आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोत तिचं जुनं घर दिसत आहे. या घरात तिचे आई-बाबा, तिची मोठी बहिण आणि भाऊ हे सगळे जण राहत होते. अतिशय गरीबीत तिने आपले बालपणीचे दिवस घालवले आहेत. मात्र स्वत:च्या कर्तृत्वावर तिने जुने दिवस बदलत नवी स्वप्नं सत्यात उतरवली आहेत.
दरम्यान, आपल्या खासगी आयुष्यातील अनेक घटना ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. आज नव्या घराची बातमी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. चाहत्यांनी देखील तिने नवं घर घेतल्याने तिचं अभिनंदन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी
-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो ‘हँडशेक’नंतर आता सभाही रद्द; पवारांचा खबरदारीचा उपाय
-“साहेब.. आता वनवास संपलाय, लवकरच अयोध्येकडे निघावं लागेल”
-माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल
-मराठीत भाषण न केल्यामुळं मला रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर गंभीर आरोप