सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…

मुंबई | सिंगल असण्याचं दु:ख वेगळंच. त्याहून जास्त अखंड सिंगल असणाऱ्यांचं दु:ख. आपल्याला आवडलेली मुलगी किंवा मुलगा आयुष्यात यावं, असं अनेकांना वाटत असतं. चित्र मात्र बऱ्याचदा वेगळं असतं.

अनेक मुलींना विवाहित पुरूष आवडतात. काहीशा वेळ घालवल्यानंतर त्या त्यांच्या प्रेमात देखील पडतात. मात्र सिंगल लोकांना, असं नेमकं का होतं? याचा मेळ लागत नाही. यावर अभिनेत्री कंगना राणावतने उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री कंगना राणावतचा लाॅक अप हा शो सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वक्तव्यामुळे शोची पसंती वाढत आहे. अनेक बोल्ड स्टेटमेंट या शोमध्ये करण्यात आली आहेत.

विवाहित पुरुष हे जास्त चार्मिंग, मॅच्युअर आणि रिस्पॉन्सीबल वाटतात आणि हेच कारण आहे की तरुणी त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. मी हे माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगते आहे, असं कंगना म्हणाली आहे.

विवाहित पुरुष रिलेशनशिपसाठी परफेक्ट असतात. पण ते मी किती साधा आहे, हे दाखवण्यासाठी स्टोरी क्रियेट करतात. मी लग्नात अडकलोय आणि मला तुझाच सपोर्ट आहे, अशा गोष्टी देखील विवाहित पुरूष करतात, असं कंगना म्हणाली.

जेव्हा तुम्ही त्यांच्या पत्नीची बाजू ऐकता तेव्हा खरी गोष्ट कळते आणि लक्षात येते की आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला, असंही कंगना म्हणाली आहे. तिच्या या दोन्ही वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, वैवाहिक सुख न मिळाल्याने अनेकदा पुरूष मुलींच्या प्रेमात पडल्याचं पहायला मिळतं. मात्र, पुरूष खरा असेल तर चुकीचं काही नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

चिंताजनक! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; संशोधनातून ‘ही’ 4 भलतीच लक्षणं समोर

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अखेर इंदौरमधून अटक

“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”

मोठी बातमी! ईडीचा नवाब मलिकांना झटका, आता…

“केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला”