खेळ देश

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

नवी दिल्ली | प्रत्येक वर्षीच्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा एक वेगळाच अंदाज असतो. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचे २०१०, २०११ आणि २०१८ असे तीन मोसम जिंकले आहे. बाकीच्या सहा सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहे.

पण या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघ तीन सामने हरले आहे. अशा परिस्थितीतही चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी आयपीएलमध्ये दुहेरी विक्रम केला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे रवींद्र जडेजा यांनी आयपीएलमध्ये २००० धावा आणि ११० विकेट घेणारे पहिले खेळाडू ठरले आहे. आतापर्यंत असा दुहेरी विक्रम कोणत्याच खेळाडूने केलेला नाही.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या रवींद्र जडेजा याने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. यात रवींद्र जडेजा यांनी दोन षटकार आणि पाच चौकार मारले.

रवींद्र जडेजा हे २००० धावा आणि ५० पेक्षा जास्त विकेट घेणारे चौथे क्रिकेटर ठरले आहे. यामध्ये शेन वॉटसन, किरण पोलार्ड, जैक कॅलिस सारखे खेळाडूंचे नाव या यादीत आहे. आता या यादीत रवींद्र जडेजा यांनीही आपले स्थान प्रस्थापित केले आहे.

रवींद्र जडेजा बोलताना म्हणाले,”आयपीएलच्या इतिहासात दुहेरी विक्रम करणारा पहिला क्रिकेटर बनल्याचा मला आनंद आहे. मला हे कठोर मेहनत करण्यास प्रेरित करेल.”

पुढे बोलताना म्हणाले,”मला खात्री आहे की, माझे कुटुंबीय आणि क्रिकेटचे चाहते हे पाहुन त्यांना माझ्यावर गर्व वाटत असेल.” ३१ वर्षीय रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंत १७६ सामने खेळले आहे.

रवींद्र जडेजा हे चेन्नई सुपर किंग्जसोबत १०६ सामने, गुजरात लायन्ससोबत २७ सामने, कोची टस्कर्ससोबत १४ सामने आणि राजस्थान रॉयल्ससोबत २७ सामने खेळले आहे. धावा आणि विकेट अशा दुहेरी बाबतीत रवींद्र जडेजा हे असा विक्रम करणारे पहिलेच भारतीय ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?