मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यावेळी राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहाराची दखल घेतली होती. त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पत्रही पाठवलं होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर सुबोध जयस्वाल यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, असा खुलासा सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीत केल्याचं समजतंय.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत होता. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात तत्कालीन एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी जुलै 2020 मध्ये एक अहवाल तयार केला होता. त्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM) यांच्याकडे हा अहवाल दिला होता.
या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर रोजी डीजीपी सुबोध जैसवाल यांना एक पत्र पाठवले.
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या पत्रावर डीजीपी सुबोध जैसवाल यांनी उत्तरच दिलं नाही, असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी असं वृत्त समोर आलं होतं की, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर एक गौप्यस्फोट केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“वाईन आणि दारुतला फरक शरद पवारांनीच समजावून सांगावा, कारण आम्ही तर पित नाही”
“हर्बल टोबॅकोच्या अती सेवनाने नवाब मलिक यांच्या मेंदूवर परिणाम झालाय म्हणून ते…”
‘ती इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकते’; ‘या’ जोडप्याने केला अजब करार
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य