“बायको हट्टाला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”

नवी दिल्ली | जर बायको हट्टाला पेटली तर पतीने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये आणि मारहाण करावी, असा एका महिला मंत्रीने पुरुषांना सल्ला दिला आहे. ज्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. या मंत्री मलेशियाच्या असून त्यांच्याकडे महिला, कुटुंब आणि समुदाय विकास खातं असल्याचं कळतंय.

महिला, कुटुंब आणि समुदाय विकास उपमंत्री सिती जैला मोहम्मह युसॉफ (Siti Zailah Mohd Yusoff) असं या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिला मंत्र्याचं नाव आहे.

सध्या त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोक नाराज झालेत. सिती यांनी इन्स्टाग्रामवर दोन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला ‘मदर टिप्स’ नाव दिलं आहे.

काही संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्वाईंट अॅक्शन ग्रुप फॉर जेंडर इक्वेलिटी नावाच्या संघटनेने सिता जैलांवर कौटुबिंक हिंसाचार सामान्य केल्याचा आरोप लावला आहे आणि राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पती आपल्या हट्टी पत्नीसोबत बोलून त्यांना मनवतात. पण जर पत्नी तरी आपले वर्तन बदलत नसेल तर पतीने तीन दिवस तिच्यासोबत झोपू नये. वेगळे झोपूनही ती हट्टाला पेटली, तिने तिचे वर्तन बदललं नाही, तर पतीने कडकपणा दाखवून तिला मारहाण करावी. पण हे जास्त कठोर नसावं. मात्र असं केल्यामुळे फक्त तिचा नवरा किती कठोर आहे आणि त्याला कोणते बदल हवे आहेत, हे तिला कळेल, असा सल्ला त्यांनी पुरूषांना दिला आहे.

जर त्या आपल्या पतीचे मन जिंकू इच्छितात, तर त्यांची परवानगी मिळाल्यावरच काहीतरी सांगा. जेव्हा पती शांत असतात, जेवून झाले असतात, त्यांची प्रार्थना झाली असते आणि आराम करत असतात तेव्हा त्यांच्यासोबत बोला. तसेच जेव्हा तुम्हाला बोलायचे असेल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या, असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

“आता सेलिब्रिटींचे कपडे उतरतील ते सुद्धा सगळ्यांसमोर” 

“चंद्रकांतदादा बेगाने शादी में नाचू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील” 

“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे” 

पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’