अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात बाळापूरच्या सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गानच्या विस्तारीकरणात शेती गेली. त्याचा मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्हधिकारी कार्यालयात एकावेळी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगाली, अर्चना टकले, मुरलीधर राऊत, आशिष हिवरकर, अबरार रोशन अहमेद अशी विष पिलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
विष पिलेल्या शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या शेतकऱ्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
सोमवारी दुपारी 4च्या सुमारास अतिरीक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
गेल्या दोन दिवसांंपासून वाढीव मोबादला मिळावा म्हणून या शेतकऱ्याचा सरकारशी संघर्ष सुरु आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं. संतप्त शेतकऱ्यांनी अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यासमोर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, मंगळवारी अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्राही आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर काय होईल???
-ईव्हीएम गेलं तर भाजपही जाणार; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-“देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार!!!”