Sleeping Habits l कमी झोपण्याच्या सवयींमुळे या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

Sleeping Habits l 6 तासांपेक्षा कमी झोप खराब करू शकते तुमचे आरोग्य, या आजारांचा धोका वाढतो! आजकाल दैनंदिन कामाच्या व्यापामुळे नागरिकांची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र बदलती जीवनशैली आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण चांगल्या खाण्याच्या सवयी आणि (Sleeping Habits) जीवनशैलीसोबतच चांगली झोप देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली आहे. दररोज चांगल्या आरोग्यासाठी 7-8 तासांची झोप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून अनेकदा सांगण्यात येत असते.

Sleeping Habits l कमी झोपेमुळे समस्या उदभवू शकतात :

मात्र 7-8 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. कारण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की कमी झोपेमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.

जे लोक कमी झोपतात किंवा ज्यांना कमी झोप येते त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही तुमच्या शरीराला पाहिजे तेवढी विश्रांती दिली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे (Sleeping Habits) जावे लागू शकते.

वजन वाढण्याची समस्या :

जर एखादी व्यक्ती 6 तासांपेक्षा कमी झोपली तर ती अनेक आजारांना बळी पडू शकते. यामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. झोप कमी झाल्यास शरीरात कॉर्टिसॉल आणि लेप्टिन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे जास्त (Sleeping Habits) भूक लागते. आणि यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो.

Sleeping Habits l कमकुवत प्रतिकारशक्ती :

शरीराला आवश्यक तेवढी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे बॅक्टेरिया तसेच संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होईल. ज्यांच्या खाण्याच्या सवयी, झोप आणि जीवनशैली चांगली असते त्याची रोगप्रतिकारशक्ती देखील व्यवस्थित काम करते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते झोपेच्या कमतरतेमुळे (Sleeping Habits) असू शकते.

स्मरणशक्तीवर परिणाम :

झोप कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येऊ लागते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण धोकादायक प्रथिने शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. (Sleeping Habits)

News Title : Human Sleeping Habits

महत्वाच्या बातम्या –

New Currency Notes l मोठी बातमी! पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा? बघा कुठे झाली नोटबंदी

Food Inflation l महागाईचा धक्का बसणार? कांद्यासह या भाज्यांचे दर सर्वसामान्यांना रडवणार

National Pension System Rules l 1 फेब्रुवारीपासून या योजनेतील पैसे काढण्यासंदर्भात नवे नियम लागू होणार

Ramayan Lectrure In Madresahs l आता मदरशांमध्ये दिले जाणार रामायणाचे धडे! या कारणामुळे घेण्यात आला हा मोठा निर्णय

First Brain Chip in Human l बापरे! मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप, मेंदूवर ठेवणार नियंत्रण