ऑस्कर सोहळ्यातील गोंधळावरून Will Smith ने मागितली जाहीर माफी, म्हणाला…

नवी दिल्ली |  जगातील अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेल्या 94 व्या ऑस्कर (Oscar) सोहळ्यात अनेक घटना घडल्या. सुत्रसंचालक क्रिस राॅक (Khris Rock) आणि अभिनेता विल स्मिथमध्ये (Will Smith) वाईट प्रसंग देखील घडला.

विल स्मिथच्या पत्नीबद्दल हास्यास्पद वक्तव्य केल्याबद्दल राॅकला सर्वांसमोर मंचावर स्मिथनं कानशिलात लगावली आणि सर्वजण जागेवर स्तब्ध झाले.

कानशिलात मारण्याच्या घटनेबद्दल विल स्मिथनं आता जाहीरपणे माफी मागतली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट करत स्मिथनं सर्वांची माफी मागितली आहे.

हिंसा ही वाईट आणि विनाशकारी असते मात्र माझ्या पत्नीच्या तब्येतीबद्दल वक्तव्य केल्यानं मी भावनिक होवून अशाप्रकारचं पाऊल उचललं होत. त्याबद्दल आपली माफी मागतो, असं स्मिथ म्हणाला आहे.

मी सार्वजनिकरित्या राॅक तुझी माफी मागतो. माझ कृत्य हे त्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारं नाही जसं मला बनायचं आहे. प्रेम आणि द्या असलेल्या जगात हिंसेला काहीच किंमत नाही, असंही स्मिथ म्हणाला आहे.

विल स्मिथच्या पत्नीला काही आजारांनी ग्रासले आहेत. परिणामी त्यावर भाष्य करताना राॅकनं व्यासपीठावरून हास्य विनोद केला होता. परिणामी ऑस्करच्या व्यासपीठावर हा सर्व प्रकार घडला आहे.

कार्यक्रमाचे आयोजक, दिग्दर्शक, निर्माता, चाहते, ज्युरी, सहकारी, कुटुंबातील सदस्य, या सर्वांची मी माफी मागतो, अशा आशयाची भावनिक पोस्ट स्मिथनं केली आहे.

दरम्यान, लाॅस एंजिलिसच्या पोलीस विभागानं याबाबत अधिक माहिती मागवली आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांना खुलासा करण्यास सांगण्यात आलं आहे.

पाहा पोस्ट – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

महत्त्वाच्या बातम्या – 

 Russia-Ukrain War: रशिया-युक्रेन युद्धात धक्कादायक घटना, ‘या’ अब्जाधीशावर झाला केमिकल हल्ला

 Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”