“युतीच्या जागावाटपाचा प्रश्न भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर”

मुंबई |  महाराष्ट्राच्या 288 जागांवाटपाचा प्रश्न हा भारत-पाकिस्तान फाळणीहून भयंकर आहे, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही सरकारमध्ये सहभागी न होता जर विरोधी पक्षांच्या बाकांवर बसलो असतो, तर  आज परिस्थिती वेगळीच असलीस असती. आम्ही जो काही निर्णय घेऊ तो लवकरच समोर येईल, असंही ते म्हणाले.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र युती होणार की नाही याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही? याबाबत बऱ्याच चर्चा घडत आहेत. त्याचं पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हो विधान सूचक आहे.

पत्रकार परिषदेत युतीबाबत मुख्यमंत्र्याना विचारलं असता, युतीची चिंता तुमच्याइतकीच आम्हालादेखील आहे. मात्र योग्यवेळी निर्णय जाहीर करू, त्यांनी म्हटलं आहे.

सेना भाजपतून येत असलेल्या वेगवेगळ्या येत आहेत. त्यामुळे युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. 

महत्वाच्या बातम्या-