मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वासह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. नेहमी हसत राहणारा सिद्धार्थ अचानक सर्वांना रडवून गेला, या गोष्टीवर अद्याप त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर तर जणू दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
एकुलता एक तरुण मुलगा सोडून गेल्याने सिद्धार्थची आई कोलमडून गेली आहे. सिद्धार्थची अगदी जवळची मैत्रिण शेहनाज गील तर अद्याप या धक्क्यात आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळची शेहनाजची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
आपला पोटच्या मुलाच्या निधनाने तुटलेली सिद्धार्थची आई या परिस्थितीत देखील शेहनाजची काळजी घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शेहनाज सिद्धार्थच्या मृत्यूपासून व्यवस्थित झोप घेत नाही. जेवण करत नाही. कोणाशी बोलत देखील नाही.
अशा परिस्थितीत शेहनाजला एकटे सोडता येणार नाही. यामुळे सिद्धार्थची आई सध्या शेहनाजची काळजी घेत आहेत. स्वत: वर दु:खाचा डोंगर कोसळून देखील सिद्धार्थची आई स्वत:ला सावरुन शेहनाजची काळजे घेत असल्याने सर्वांना त्यांचं कुतूहल वाटत आहे.
दरम्यान, शेहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.
या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात
कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ