“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

जळगाव | राज्यात महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाने किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली.

सरकारच्या या निर्णयानंतर भाजप सरकार आक्रमक झालेलं पहायला मिळालं. भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही वाईन विक्रीविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनं वाईन विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अण्णा हजारेंनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं एका पत्रकात म्हटलं आहे.

वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अण्णा हजारे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांना आपल्या व्यथा आणि वेदना सांगितल्या. मार्केटमध्ये द्राक्षांना भाव पाहिजे असेल तर, द्राक्षांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

अलिकडच्या कालखंडांपासून वाईन सर्वत्र विकली जात आहे. परंतु वाईन ही दारू आहे, त्यामुळे गावापर्यंत दारु जात असल्याची भूमिका अण्णा हजारेंनी घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

गावाकडे दारु जात आहे त्यामुळे त्यांनी वाईन विक्रीला विरोध केलाय, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा देखील लगावला.

भाजप सरकारनं मध्य प्रदेशातील मॉलमध्ये बिअर विकायला परवानगी दिली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर 50 रूपयांमध्ये दारु देऊ, असं वक्तव्य तेथील प्रदेशाध्याक्षांनी केलं होतं. याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.

भाजपशासित राज्यात वाईनवर वेगळी भूमिका आणि महाराष्ट्रात वेगळी भूमिका, अशी दुप्पटी भूमिका भाजप का घेतंय?, असा सवाल देखील खडसेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”

शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध

कुडाळमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, पोलीस घटनास्थळी दाखल

Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो