…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. हे काही क्षणातच व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी रात्री पळणाऱ्या मुलाला पाहिलं आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा खांद्यावर बॅग लटकवून रस्त्यावरून पळताना दिसतोय. यामागचं कार ऐकलं तर तुम्हालाही याचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

कपरी यांनी मुलाला कारने लिफ्ट देण्याची ऑफर दिली, परंतु वारंवार विनंती करूनही त्या मुलानं त्यांची ऑफर स्विकारली नाही.

रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे प्रदीप मेहरा असून प्रदीप रोज दहा किलोमीटर धावत घरी जातो. दहा किलोमीटर धाऊन तो घरी जाणार. त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार.

प्रदिपला आर्मी जाॅईन करायची म्हणून तो रोज 10 किलोमीटर धावत जातो. त्यामुळे तो शिफ्ट झाल्यावर रोज घरी जाताना धावतो. प्रदिपचं वय अद्याप 19 वर्षे आहे. पण आपल्या स्वप्नांसाठी त्याची मेहनत पाहून कोणालाही त्याचं कौतुक वाटेल.

दरम्यान, प्रदिप नोएडामध्ये त्याच्या भावासोबत राहतो आणि त्याची आई रुग्णालयात आहे. प्रदिपचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  ‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य

  लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

  “फक्त म्हणायला ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेतं पवार सरकार”

  बायकोनं मटन बनवलं नाही म्हणून नवऱ्याने फिरवला फोन, पोलीस घरी आले अन् घडलं भलतच!