…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी मारून केली आत्महत्या

कोटो |  गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचा ही लाट आधिच्या लाटेपेक्षा खूप भयानक असल्याचं दिसून येतं आहे.

दिवसेंदिवस होत असलेल्या गंभिर परिस्थितीमुळे आरोग्य सेवेवर ताण आला आहे. त्यामुळे काही-काही रूग्णांना उपाचारासाठी बेड मिळत नाहीय. तसेच या दिवसांमध्ये यासंबंधीच्या अनेक घटना आपल्या कानावर पडत आहेत. अशातच देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

कोटामधील एका आजी-आजोबांनी कोरोनाची लागण झाली असल्यामुळे ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या नातवाला कोरोनाची लागण होऊ नये, या भिती पोटी आजी-आजोबांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात एक वृत्त न्यूज 18ने दिले आहे. त्यानूसार पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितले की, ही घटना रविवारी 2 मे रोजी सायंकाळी घडली. हिरालाल बैरवा वय 75वर्ष आणि त्यांची पत्नी शांती बैरवा वय 75 वर्ष, अशी मृत आजी- आजोबांची नावं आहेत.

त्या दोघांनी कोरोनाची टेस्ट केली असता, त्यांचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला. तेव्हापासून ते तणावामध्ये होते. यामुळे त्यांनी घरातचं क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्यामुळे आपला नातू रोहितला कोरोनाची लागण होण्याची सतत भिती वाटत होती.

यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह एमबीएस रूग्णालयामध्ये पाठवले. ते मृतदेह तेथील शवगृहामध्ये ठेवण्यात आले असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चक्क जावयासोबत सासू गेली पळून, त्यानंतर जे घडलं ते ऐकून…

वाह! ‘वदनी कवल घेता…..’ म्हटल्याशिवाय…

‘दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात…

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन,…

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy