मुंबई | मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा राजकीय गोंधळ पहायला मिळत होता. 2019 ला अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनिश्चततेचा काळ दिसू लागला होता.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालं होतं. निवडणूक झाली. भाजप-सेनेला बहुमत मिळालं. मात्र, पुढील 2 महिने काही राज्याला सरकार मिळालं नाही. अखेर संपुर्ण समीकरणाची जुळवा जुळव झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.
भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना अनेक आमदारांना आपली जागा वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, अखेर काहींना आपली जागा सोडावी लागली. तर काहींनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
अशातच यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजू तोडसाम यांचं देखील तिकीट कापण्यात आलं होतं. त्यानंतर राजू तोडसाम नाराज असल्याचं बोललं जात होतं.
अशातच आता राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2014 साली आमदार म्हणून लोकांचं काम पाहण्याची मला संधी मिळाली. मी आदिवांसीच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो. मी आदिवासी लोकांचे प्रश्न वारंवार उपस्थित केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी माझं तिकीट कापलं, असं राजू तोडसाम म्हणाले आहेत.
मी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मला भाजपमध्ये थांबण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, असंही राजू तोडसाम म्हणाले आहेत.
भाजप सोडताना माझ्या मागे ईडी लागेल याची काही चिंताच नाही, कारण मी आदिवासी माणूस आहे, त्यांना माझ्याकडे काहीच सापडणार नाही, असंही राजू तोडसाम म्हणाले आहेत.
भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावललं जातंय, त्यामुळे राजू तोडसाम यांच्यासारखे नेते आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. राजू तोडसाम यांच्या येण्यानं पक्षाला मजबूती मिळल, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर मुख्यमंत्र्यांचे पाय धरायलाही मागेपुढे पाहणार नाही”
“हवं तर तुमच्या पाया पडतो पण राजसाहेब हा प्रश्न सोडवा”
“सरकारमध्ये कोणाशी बोलायचं हे राज ठाकरेंना चांगलंच माहितीये”
“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”
फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर